बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतीच्या हस्ते होणार सन्मान.

अंबाजोगाई दि.31 जुलै – अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षक डाॅ. कमलाकर कोंडिबा राऊत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार (National Ideal Teacher Award) जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर शिक्षक दिनी (Teachers Day) राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
(Another prestigious tura in the crown of Beed district; The honor will be handed over to the President.)
डाॅ.कमलाकर राऊत अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयात गेल्या वीस वर्षापासून मराठी विषयाचे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मराठी विषयात डाॅक्टरेट (Doctorate) पदवी प्राप्त केली आहे. तसेच नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रात भरीव कार्य आहे. त्याचप्रमाणे विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2016 सहशिक्षक कमलाकर राऊत यांना जाहीर करण्यात आला आहे. पन्नास हजार रुपये रोख, रौप्य पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार सहशिक्षक कमलाकर राऊत यांनी शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येत आहे.
डॉ. राऊत यांच्या यशाबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, सचिव अॅड. उदयकुमार कामखेडकर, उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कराड, सहसचिव प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव गणपत व्यास गुरूजी, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका के.टी. व्यास, उपमुख्याध्यापिका ए.डब्ल्यू. साळुंके, सर्व पदाधिकारी व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.