वक्फची शंभर एकर जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस; सहा जणांवर गुन्हा.

बीड दि.4 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्ह्यात पुन्हा एक नवीन वक्फ (Waqf) जमीन बळकावण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आष्टी (Ashti) तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमीन बनावट संमतीपत्राआधारे बळकावल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी काल दि.3 सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात (Police station) सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.

(Another type of usurpation of one hundred acres of Waqf land was uncovered; Crime on six people.)

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात देवस्थानच्या जमिनी बळकावण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अधिकार नसताना जमिनी खरेदी विक्री व फेरफार व दस्तावेजाच्या नोंदी करण्याचे प्रकार चव्हाट्यावर आले आहेत. यातच आष्टी तालुक्यातील आणखी एका देवस्थानाच्या जमिन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास म्हणून शंभर एकर जमीन शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जिमनीची देखभाल करतात.

दरम्यान, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाहा पानसरे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, आजिनाथ त्र्यंबक बोडखे, संजय भाऊसाहेब नालकोल व शरद नानाभाऊ पवार यांनी संगनमत करुन खोटे, बनावट व बोगस कागदपत्र तयार केले. शेख महमंद बाबा दर्गा देवस्थानाचे नाव 7/12 अभिलेखात कब्जेदार रकान्यातून कमी करून स्वत:चे नाव लावून शंभर एकर जमिनीचा अपहार केला. ही बाब 2020 मध्ये लक्षात आल्यानंतर शेख दस्तगीर महंमद यांनी तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन तक्रार केली.

शिवाय या प्रकाराबाबत जिल्हा वक्फ कार्यालय व पोलीस विभागाला संबंधितांकडून तक्रार अर्ज देण्यात आले. तसेच उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकारी, भूसुधार सामान्य विभाग यांच्याकडेही तक्रार अर्ज केले. त्यानंतर सदरील प्रकरणाची सुनावणी सुरु झाली, त्यात ही बोगसगिरी चव्हाट्यावर आली.

अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण सुरु असताना 17 ऑक्टोबर 2017 ते 2020 या कालावधीत शंभर रुपयांच्या बाँडवर बनावट संमतीपत्र (Fake consent form) तयार करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दस्तगीर महंमद शेख यांनी आष्टी ठाण्यात दि.3 सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरुन आजिनाथ त्र्यंबक बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, (सर्व रा.आनंदवाडी), शेख मुस्ताक बादशाह पानसरे, संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा (crime of fraud) नोंद करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!