केज नंतर बीड व अंबाजोगाईत मोकारांवर ॲन्टीजनची कारवाई; 15 पथके नियूक्त.

बीड दि.3 मे – कोरोना संसर्गाची (Corona Infection) साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) करूनही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आटोक्यात येत नाही. उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुणावनीत मोकार फिरणाऱ्या लोकांची ॲन्टीजन करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सर्व विभागांना आदेश दिले आहेत. हाच धागा पकडून आता आरोग्य विभागाने अशा लोकांना पकडून अँटिजेन चाचणी (Antigen Test) करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Antigen action on Mokar in Beed and Ambajogai after Kaij; 15 squads assigned.)

यावर सर्वप्रथम केज येथील स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणी केली असून शनिवार व रविवारी केलेल्या ॲन्टीजन चाचणी (Antigen Test) कारवाईत 22 कोरोना बाधित आढळली आहेत. आता आज सोमवारपासून बीड व अंबाजोगाईतही ॲन्टीजन मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी 15 पथकांची नियूक्ती केली आहे. यात पोलिसांचाही समावेश असणार आहे. अशा मोहिम जिल्हाभरात राबवण्याची मागणी होत असताना आता आरोग्य विभागानेच पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही मोहिम राबवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित Corona Positive) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज बाधितांची संख्या दीड हजाराच्या पार जात आहे. तसेच मृत्यूही वाढत आहेत. वाढती कोरोना बाधित रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) करण्यात आले. परंतू याचे लोक पालन करत नसल्याचे समोर येत आहे. काही काम नसतानाही काही लोक विनाकारण शिथिल वेळेच्या 11 नंतर रस्त्यावर फिरून कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) वाढवित आहेत.

वारंवार आवाहन करूनही ऐकत नसल्याने आता जे लोक रस्त्यावर दिसतील त्यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. याला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. यासाठी बीडमध्ये 10 व अंबाजोगाईत 5 पथकांची नियूक्ती केली आहे. यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांचाही समावेश असणार आहे. जे लोक याला विरोध करतील त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा रूग्णालय व स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात रूग्णांना भेटणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासोबतच इतर आजाराच्या उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. शिवाय पुढारपण करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात याभागात असते. यामुळे येथून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे येथेही विनाकारण आलेल्या लोकांची चाचणी करण्यासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियूक्ती केली आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची सोमवारपासून ॲन्टिजन चाचणी केली जाईल. यासाठी बीड व अंबाजोगाईत 15 पथके नियूक्त केले आहेत. जिल्हा रूग्णालय व स्वारातीत स्वतंत्र पथके असतील. आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा पथकात समावेश असेल. जे लोक विरोध करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!