व्यापाऱ्यांना ॲन्टीजन चाचणी बंधनकारक… बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड दि.8 मार्च – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोनाचा (corona) वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. आठवडे बाजार बंदीनंतर आज व्यापाऱ्यांना कोरोनाची ॲन्टीजन तपासणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेत 15 मार्चनंतर दुकाने बंद करण्याचा आदेश काढला आहे.
(Antigen test mandatory for traders … Beed Collector’s order)
गेल्या आठवड्यापासून बीड (Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना (corona) प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या बैठका घेवून ॲन्टीजन (Antigen) तपासण्या करण्याचे आवाहन केले होते. यासाठी 1 मार्च ते 5 मार्च स्वतंत्र मोहिम राबवण्यात आली. मात्र जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
मागिल तीन दिवसात जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आज व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी काढत ॲन्टीजन (Antigen) तपासणी बंधनकारक केली आहे.
दि.15 मार्चपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी ॲन्टीजन चाचणी करावी नसता दुकाने सिल करण्याचे आदेश आज दि.8 मार्च रोजी सायंकाळी काढले आहेत. यापुर्वी जिल्ह्यातील आठवडे बाजार व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासर्व आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.