धारुर पोलिस हद्दीत मोठी कारवाई; संशयिताकडे आढळले लाखोंचे घबाड.

किल्ले धारूर दि.7 एप्रिल – धारुर (Dharur) पोलिस हद्दीतील उमराई परिसरात सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत ( Assistant Superintendent of Police Pankaj Kumawat) यांनी पथकासह आज पहाटे एका वस्तीवर कारवाई केली. यात लाखो रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले असून याची कसून चौकशी सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी आडस होळ रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणात अज्ञाताविरुध्द खूनाचा (Murder) गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रकरणाचा कसून शोध पोलिस घेत आहेत. अद्याप सदर व्यक्ती कोण ? याचा तपास लागलेला नाही. परिसरात बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त नसल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
याचा तपास सुरु असतानाच सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत आडस उमराई परिसरात एका वस्तीवर परप्रांतिय लोकांचा संशयास्पद (suspect) वावर असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर आज दि.7 गुरुवारी स्वतः कुमावत (Assistant Superintendent of Police Pankaj Kumawat) यांनी पथकासह सदर वस्तीवर कारवाई केली. यात लाखो रुपयांचे घबाड पोलिसांनी हस्तगत केले. अत्यंत गरीब व भिक मागुन गुजरान करणाऱ्या कुटूंबियांकडे मोठी रक्कम मिळाल्याने संशय निर्माण झाला आहे.
सदर वस्तीवरील धाडीत (Police raid) जवळजवळ बारा ते तेरा लाख रुपये जप्त केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कलम 124 प्रमाणे कारवाई करत सदर रक्कम न्यायालयात जमा केली आहे. याची चौकशी करण्यासाठी सदर वस्तीतील प्रमुख परप्रांतिय व्यक्तींना धारुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस या प्रकरणी कसोशीनी चौकशी करत आहे.
( Major action in Dharur police limits; The suspect was found with millions of rupees. )