चिंता वाढली… महाराष्ट्र व गुजरातमध्येही आढळले ओमिक्रॉनचे रुग्ण.

मुंबई दि.4 डिसेंबर – कोरोना विषाणूचा (Corona virus) अत्यंत धोकादायक व्हेरियंट मानला जाणारा ओमिक्रॉनचा (Omicron) तिसरा रुग्ण देशात आढळून आला आहे. गुजरातच्या (Gujrat) जामनगरमध्ये व महाराष्ट्राच्या मुंबईत कल्याण डोंबिवली येथेही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. देशात आता तीन राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
(Anxiety increased … Omicron patients were also found in Maharashtra and Gujarat.)
कर्नाटकानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये व महाराष्ट्र (Maharashtra) मुंबईत नव्या व्हेरियंटचा (New variant) संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने (Health Department) सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे. तर महाराष्ट्रातील 33 वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिका (South Africa) केपटाऊन येथून आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.
गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय 72 वर्षे आहे. गुरुवारी त्यांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आला होता. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याची पुष्टी केली.
कोरोनाच्या मूळ व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये 50 हून अधिक म्युटंट झाले आहेत. त्याचे स्पाइक प्रोटीनमध्ये देखील लक्षणीय बदल झाले आहे. अशा स्थितीत डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ते अधिक घातक ठरू शकते, असे मानले जाते, जे भारतातील दुसऱ्या लाटेला कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. असे मानले जाते की ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या लसींनाही मात देऊ शकते. परंतु याची पुष्टी करण्यासाठी अद्याप जास्त डेटा उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने याचे वर्णन व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून केले आहे.
देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटची एकूण 4 प्रकरणे आढळून आली आहेत. यापूर्वी कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एक रुग्ण आधीच दुबईला परतला आहे, तर दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दुसऱ्या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही. यानंतर आज गुजरात व महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने राज्याची चिंता वाढली आहे.