नवऱ्यानेच लावले गावात पत्नीचे पोस्टर्स; बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

बुलडाणा दि.14 मार्च – नवऱ्याने गावात पत्नीचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली असून याबाबत आरोपी विरोधात पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Posters of wife in village planted by husband; Shocking type at Buldana)
समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघायला मिळतात. अशाच एका मनोविकृत व्यक्तीने बायको घटस्फोट देत नसल्याने चक्क सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्याच बायकोचे पोस्टर्स लावून त्यावर गरज पडल्यास संपर्क साधा, असं लिहिलं आहे. तसेच काही मोबाईल क्रमांकही यावर दिले असल्याचे कळते. समाधान निकाळजे नामक आरोपीने हा प्रताप केला असून महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसात (Police) आरोपी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी महिलेच्या भावाने या आरोपीसोबत फोनवर चर्चा केली असता चिखली तालुक्यात आरोपीनेच पोस्टर्स लावले असल्याची माहिती आहे. दरम्यान, घटस्फोट नाही दिला तर बायकोची बहीण व सासूचे सुद्धा पोस्टर्स लावून बदनामी करण्याची धमकी या विकृत आरोपीने दिली आहे.