भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के शिवाय 47 जणांना जामीन.

बीड दि.30 डिसेंबर – मंगळवारी अतिरिक्त पोलिस अधिक्षक (Additional Superintendent of Police) पंकज कुमावत यांनी बीड येथे क्लबवर केलेल्या कारवाईतील 47 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला.

(Apart from BJP district president Rajendra Maske, 47 others have been granted bail.)

याप्रकरणी पोलिसांकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची जागा असल्यामुळे त्यांचा आरोपीत समावेश करण्यात आला होता. मात्र याबाबत अद्याप चौकशी पुर्ण झालेली नसून मस्के यांच्या जामीनाबाबत कसलाही निर्णय झालेला नाही.

मंगळवार (दि.28) मध्यरात्री भाजपा जिल्हाध्यक्ष (BJP District President) राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेवर सुरु असलेल्या अलिशान पत्त्याचा क्लब असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी कारवाई केली होती. यात तब्बल 47 जुगारी आढळून आले. या कारवाईत अनेक महागडी वाहनं, मोबाईल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती.

पोलिसांनी (Police) याप्रकरणी जागा मालक म्हणून राजेंद्र मस्के (Rajendra Maske) यांच्यासह चालक व अवैध जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद केला. यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष मस्के यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणात सत्तेचा गैरवापर करुन जाणूनबुजून माझे नाव गोवण्यात येत असल्याचा आरोप करत सदरील जागेशी माझा काहीही संबंध नसल्याचे जाहिर केले होते.

दरम्यान, बुधवारी याप्रकरणातील 47 आरोपींना न्यायालयात जामीन मंजूर झाला. मात्र राजेंद्र मस्के यांच्या या प्रकरणातील जागा मालकीच्या दाव्यावर तपास पुर्ण नसल्याने त्यांच्यावर कसलाच निर्णय झालेला नाही. याप्रकरणाचा पोलिसांकडून (Police) तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!