धारुरच्या उसतोड मजुरावर काळाचा घाला; दोन ठार सात जखमी.

परळी दि.21 डिसेंबर – धारुर तालुक्यातील उसतोड मजुरांना गावाकडे परत घेवून जाणाऱ्या वाहनास अपघात होवून दोघांचा मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(Put black on Dharur’s sugarcane laborers; Two killed, seven injured.)

याबाबत सविस्तर वृत असे की, धारुर (Dharur) तालुक्यातील कोयाळ येथील उसतोड मजुर (Sugarcane laborers) गावाकडे जिपमधून परतत होते. सोमवारी (दि.20) रात्री साडे आठच्या सुमारास परळी (Parli) तालुक्यातील सरफराजपुर येथे सदर वाहनास अपघात होवून पलटी झाले. या अपघातात दोघे जागिच ठार झाले.

विशाल गौतम वाव्हळे (18) व वैजनाथ रामा वाव्हळे (65) दोघेही राहणार कोयाळ ता. धारुर यांचा मृतात समावेश आहे. या अपघातात (Accident) सात जण जखमी झाले. जखमीत बाळासाहेब कोंडीबा मुंडे (65), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (50), रमेश भगवान वाव्हळे (40) सर्व रा. कोयाळ, अरुण नामदेव गायकवाड (55), शोभाबाई गायकवाड (50) दोन्ही रा.तळेगाव, अनिता संजय डोंगरे (40), संजय दासू डोंगरे (45) रा. हिंगणी हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ अंबाजोगाई (Ambajogai) येथील शासकीय रुग्णालयात हलवले. जखमी पैकी बाळासाहेब कोंडीबा मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लातूर येथे पाठवण्यात आले आहे. इतर सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ शासकीय (SRTR) रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!