ऐतिहासिक

Archaeological Department धारुरमध्ये आढळले मुर्तीचे अवषेश ; पुरातत्व खात्याकडून पाहणी.

54 / 100

किल्लेधारूर दि.05 मे – Archaeological Department धारूर येथे एका घराचे घराचे खोदकाम सुरु असताना पुरातन मूर्तीचे अवशेष आढळून आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरातत्व खात्याला याबाबत माहिती दिल्यानंतर सदर मुर्तीचे अवशेष व जागेची पाहणी करण्यात आली.

( Archaeological Department … Remains of idol found in Dharur; Inspection by Archaeological Department. )

याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर शहरातील कसबा विभागमध्ये आई तुळजाभवानी मंदिरासमोर विकास शिनगारे यांच्या घराचे बांधकाम चालू असतांना खोदकामा दरम्यान विकास गालफाडे या कामगाराला दि.03 मे 2023  बुधवारी मूर्तीचे अवशेष सापडले. मूर्ती सापडल्याची माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रवि गायसमुद्रे, आकाश सिरसट, राकेश सिरसट, प्रकाश गायसमुद्रे यांना मिळाली. सामाजिक कार्यकर्त्यांनी मूर्ती पाहून या विषयी माहिती राज्य पुरातत्व विभाग Archaeological Department छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) यांना कळवली. त्यानंतर पुरातत्व विभागचे बीड येथील कर्मचारी सय्यद रहीम व धारुर Dharur येथील कपिल समर्थ हे पंचनाम्यासाठी घटनास्थळी आले व पंचनामा करून ती मूर्ती हस्तगत करून पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आली आहे.

2001 मध्येही सापडल्या होत्या मुर्त्या…
किल्लेधारुर हे शहर अतिशय पुरातन काळापासून वसले असल्याचे पुरावे आढळून येतात. धारुर Dharur नगराशी राष्ट्रकुट राजाचा संदर्भ मिळतो. राष्ट्रकुट हे स्वतः जैन धर्माचे उपासक होते. एकेकाही धारुर नगरी जैन वसई असल्याचे इतिहासात नमुद आहे. कसबा विभागात असलेले आजचे धारेश्वर मंदिर हे एक जैन मंदिर होते. या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच 2001 मध्ये अनेक जैन मुर्त्या आढळून आल्या होत्या. 1948 मध्येही येथे अनेक मुर्त्या सापडल्या होत्या. यासर्व मुर्त्या सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या संग्रहालयात मांडण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!