आरणवाडी साठवण तलावाच्या पाण्यात फॉर्च्युनर कार बुडाली.

किल्लेधारूर दि.३० (वार्ताहर) आरणवाडी साठवण तलावाच्या पाण्यात औरंगाबाद येथील फॉर्च्युनर कार इतर वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कोसळल्याची घटना मंगळवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
( Fortuner car drowned in the water of Aranwadi storage tank. )
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार धारुरहून (Dharur) औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेला जात असलेली फॉर्च्युनर कार (Fortuner car) इतर वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्यामुळे आरणवाडी साठवण तलावाच्या पाण्यात गेली. सुदैवाने फॉर्च्युनर कारमधील दोघे जण सुखरुप आहेत. कारबाबत व आतमधील व्यक्तींची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. स्थानिक नागरीकांना याची माहिती मिळताच युवक महेश गवळी, नितीन पवार, आकाश गैबी, सचिन चिरके यांनी घटनास्थळी जावून बचावकार्य केले. कार संपुर्णपणे पाण्यात बुडाली असून धारुर पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.548 सी (National Highway 548 C) वरील आरणवाडी साठवण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात अपघाती (accident) वळणं आहेत.