अन तब्बल 14 गुन्ह्यांचा झाला उलगडा… मुद्देमालासह चौघे गजाआड.

बीड दि.27 जून – बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरुर तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) आवळल्या. यात चार जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा एकूण 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. आता पर्यंत त्यांनी 14 ठिकाणी दरोडे व चोऱ्या केल्याची माहिती पोलीसांना (Police) दिली आहे.

(As many as 14 crimes were solved … Four people were arrested with issues.)

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरुर येथे गेल्या काही वर्षात अनेक दरोडे व चोरीच्या घटना झालेल्या आहेत. यात पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील नामदेव विठ्ठल मंडलीक यांचे भरदिवसा घर फोडले होते. याप्रकरणी त्यांनी पाटोदा पोलिसात रितसर तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) या दरोडेखोराच्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल आष्टीत सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलीसांनी (Police) कसून चौकशी केली असता त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. यात एक रोड रॉबरी तर 13 घरफोड्या करुन लाखोचा मुद्देमाल हडप केला आहे. पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याजवळ 6 तोळे सोने, 68 हजाराची रोकड व एक मोटार सायकल मिळून आली.

पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पैकी नवनाथ उर्फ मटक्या ईश्‍वर भोसले (वय 20, रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर), दिपक उर्फ पल्या ईश्‍वर भोसले (वय 28, रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर), गहिनीनाथ ईश्‍वर भोसले (वय 33, रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर), चिमन्या मैदान भोसले (वय 36, रा. कासारी ता.केज.जि.बीड) हे आहेत. नफरवाडीत घरफोडीत गहिनीनाथ हा नव्हता गहिनीनाथ यांने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. त्याच्या शोधात नेकनूर पोलीस होते.

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. पुढील तपासासाठी चौघांना पाटोदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलिस निरिक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक (PSI) संतोष जोंधळे, पोलिस उपनिरिक्षक (PSI) भगत दुल्लत, पो.कॉ. जगताप, डोळस, शेख नसीर, रामदास तांदळे, प्रसाद कदम, सतिष कातखडे, सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, नरेंद्र बांगर, बागवान, पवार, ठोंबरे, कुळेकर, वंजारे, हरके, हराळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!