राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदी प्रा. इश्वर मुंडे

औरंगाबाद दि.२२(वार्ताहर) येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.इश्वर मुंडे Ishwar Munde यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या NCP ओबीसी सेल आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. आज औरंगाबाद येथे राष्ट्रवादी NCP ओबीसी सेलच्या वतीने आज मराठवाडा विभागीय ओबीसी जागर परिषद व प्रा.दिवाकर गमे साहेब यांचा जाहीर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष इश्वर बाळबुधे, प्रा.दिवकर गमे, बीड जिल्हाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत यांच्या सह मराठवाड्यातील ओबीसी सेलच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.