अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रीटचे स्लॅब जळत्या चितेवर कोसळले; लोकांची धावपळ.

पुसद दि.18 जुलै – यवतमाळ जिल्ह्यात एका महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रीटचे शेड स्लॅबसह अचानक जळत्या चितेवर कोसळले. यामुळे चितेवरील जळत असलेले पार्थिव त्याखाली दबले गेले. पुसद तालुक्यातील निंबी येथे शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली.

(At the funeral a shed of chucky cement concrete collapsed on a burning dead body; The rush of people.)

पुसदपासून चार किलोमीटर अंतरावरील निंबी येथील रहिवासी महिला रुक्मा साहेबराव हराळ (वय 55 वर्ष) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या अंत्य संस्कारासाठी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक जमले होते. दुपारी तीन वाजता स्मशानभूमीत (Cemetery) ग्रामपंचायतीने बांधलेल्या दहन शेडमध्ये सरण रचण्यात आले. सर्व सोपस्कार केल्यानंतर अग्नीढाग देण्यात आला.

पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज होवून सिमेंट काँक्रीटच्या शेडचा स्लॅब (Cement concrete slab) अचानक कोसळला. त्याखाली पार्थिव आणि सरण पूर्णपणे दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्व जण अवाक् झाले. सरणाजवळ जमलेली लोक आवाजामूळे बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली. सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबखाली (Cement concrete slab) दबलेल्या पार्थिव आणि सरणाला बाहेर कसे काढावे? असा प्रश्न अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांना पडला होता.

दरम्यान, सदरील घटना सरपंच आणि ग्रामसेवकांना कळवण्यात आली. परंतु सायंकाळपर्यंत घटनास्थळी कुणीही पोहोचले नव्हते. या दहन शेडचे बांधकाम ग्रामपंचायतीकडून तीन वर्षापूर्वीच करण्यात आलेले आहे. निकृष्ट बांधकामामुळे हा अपघात (accident) घडला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!