क्राईम
ATM धारुरमध्ये चक्क एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली.

किल्लेधारुर दि.22 जून – धारूर तेलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन ATM चोरट्यांनी पळवल्याची घटना मध्यरात्री घडली.
पिकप गाडीच्या साह्याने मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय स्टेट बँक शाखा तेलगाव रोड येथील 21 ते 22 लाख रोकड असलेली एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवली. सदर बाब पोलिस व बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताते पहाटे सदर पिकअपचा पाठलाग केला. माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे चोरी करणारे पिकप वाहन सापडले असून मशीन मात्र पोलिसांच्या हाती लागलेली नाही. याबाबत धारुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डि.बी. वाघमोडे यांच्याशी संपर्क केला असता सदर पिकअप संभाजीनगर येथून चोरी केलेला असून गुन्ह्याचा तपास जलद गतीने करुन एटीएम व आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली.