नांदेडात पोलिसांवर ‘हल्लाबोल’; होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या मिरवणूकीत घडला प्रकार.

नांदेड दि.29 मार्च – नांदेडमध्ये लॉकडाऊन (lockdown) असल्याने होळी नंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणूकीलाही परवानगी नव्हती. परंतू सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास येथील जगप्रसिध्द गुरुद्वारा मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले. गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. पोलीसांशी (Police) हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग (Barricading) तोडत जमाव थेट गुरुद्वारात दाखल झाला आणि पोलिसांवर हल्ला केला. यात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.

(‘Attack’ on police in Nanded; It happened in the procession of the Sikh community which started after Holi.)

याबाबत सविस्तर माहिती अशी, की देशभर आज धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिख समाजात धुलिवंदन दिवशी हल्ला बोल मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. शहरातून हि मिरवणूक निघून येथील जगप्रसिध्द गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम होवून सांगता होते. मात्र सध्या नांदेड शहरात लॉकडाऊन (lockdown) असल्याने या मिरवणूकीला परवानगी नाकारण्यात आली होती.

परंतू सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास येथील जगप्रसिध्द गुरुद्वारा मध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले. हातात शस्त्र असलेल्या या जमावाने अखेर सुरक्षा कवच असलेले बैरिकेटिंग (Barricading) तोडून गुरुद्वारा मध्ये प्रवेश केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांवर जमावाने हल्ला केला. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल फोडन्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांची गाडी फोडण्यात आली.

नांदेड (Nanded) मध्ये दररोज कोरोना चे एक हजार हुन अधिक रुग्ण सापडत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवार पासून टाळे बंदी करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही आज शीख समाजाच्या वतीने हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात 10 पोलीस (Police) जखमी झाले. तर 30 ते 40 मोबाईल फोडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडण्यात आली असून सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!