अल्पवयीन अत्याचारीत गर्भवती मुलीला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; केज तालुक्यातील घटना.

केज दि.3 सप्टेंबर – केज (Kaij) तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बळजबरीने बलात्कार (Rape) केला. पीडिता गर्भवती राहिल्याचे कळताच तिला विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुष्कर्म करणारा नराधम हा पीडित मुलीच्या भावकितील असून नात्याने चुलत चुलत भाऊ आहे.
(Attempted murder by pushing a minor abused pregnant girl into a well; Incidents in Kaij taluka.)
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावकितील नात्याने चुलत चुलत भाऊ असलेल्या नराधमाने तीन महिन्या पूर्वी म्हसोबाचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात बळजबरीने बलात्कार केला. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती होताच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा (attempt to murder) प्रयत्न केला.
याची माहिती अल्पवयीन मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितल्या नंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून दि.2 सप्टेंबर रोजी रात्री केज पोलीस (Police) ठाण्यात आरोपी नराधमाच्या विरुद्ध फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 2 सप्टेंबर रोजी त्याच्या विरुद्ध गु र नं / 2021 भादंवि 376, 376 (2) (टी) (एन) 307 यासह बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10 नुसार बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न करणे व बाल लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण म्हणचे पोक्सो (POCSO) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी ठाणे अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) संतोष मिसळे यांनी गुन्हा दाखल केला. प्रभारी ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) सिमाली कोळी व पिंक पथकाच्या रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.