मुख्य सुत्रधार पोलिसांच्या ताब्यात… पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.

किल्लेधारूर दि.24 सप्टेंबर – मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे तू रस्त्यावर ये, असे म्हणत फूस लावून बोलावून नाकलगावच्या 19 वर्षीय युवकाला मारहाण करून धारूर घाटात (Dharur Ghat) नेत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवार दि.23 रोजी पहाटे घडली. दरम्यान चार जणांविरुद्ध दिंद्रुड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य सुत्रधाराला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.

(Attempting to burn a young man alive by throwing petrol; Thrill in Dharur Ghat.)

कृष्णा अर्जुन गायकवाड (वय 19) वर्षे राहणार नाकलगाव. हा बुधवार दि.21 रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातील किराणा दुकाना समोर थांबला होता. त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड याचा फोन आला. आपल्याला मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तू रस्त्यावर ये, कृष्णा आदिनाथ च्या बोलण्यावरून वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर गेला.

त्यावेळी आदिनाथ व त्याच्या सोबत असणाऱ्या इतर 4 लोकांनी कृष्णाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. बेदम मारहाण करुन त्यास पोत्यात टाकून चारचाकी वाहनातुन सोनिमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात गाडीतून फेकून दिले. यावेळी कृष्णाच्या अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने (Attempts to kill alive) पेटवून देऊन ते चार जण निघून गेले. यावेळी काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कृष्णाला जवळील वस्तीवरच्या लोकांनी आपल्या वस्तीवर आणून जखमी कृष्णाच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली.

दरम्यान कृष्णावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात (SRTR) उपचार सुरु आहेत. कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून (Complaint) आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड व इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुर 197/ 2021 भा.द.वि.307, 365, 342 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) प्रभा पुंडगे या करत आहेत.

मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
दिंद्रुड पोलिसांनी आदिनाथ सुधाकर गायकवाड राहणार मंगळुरपीर नंबर 2 याला मंगळवार रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रभा पुंडगे, पीएसआय (PSI) राडकर व त्यांचे सहकारी यांनी पकडून ताब्यात घेतले आहे. सध्या त्याला येथील ठाण्याच्या कोठडीत गजाआड करण्यात आले आहे. सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीला एका दिवसाच्या आत अटक करण्यात दिंद्रुड पोलिसांना यश मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!