संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या
परळी पञकारांची मुख्यमंञ्याकडे मागणी

परळी वैजनाथ दि.१३(प्रतिनिधी) न्यूज मिडियाचे प्रतिनिधी तथा परळी पञकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या,अश्या मागणीच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांना परळी पञकारांच्या वतिने परळीचे तहसीलदार डॉ विपीन पाटिल यांच्या मार्फत आज देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,न्युज मिडियाचे प्रतिनिधी तथा परळी पञकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे यांनी परळी येथील शासकीय गोदामातील रेशन चोरीची माहिती प्रशासनाला का दिली म्हणुन 8 ते 10 आरोपींनी संभाजी मुंडे यांच्या घरी जाऊन शस्ञाने प्राणघातक हल्ला केला यात संभाजी मुंडे त्यांच्या पत्नी पार्वती मुलगा विष्णू मुंडे गंभीर जख्मी झाले आहेत.हा गुन्हा घडुन आज तिसरा दिवस आहे पोलिसांनी यातील केवळ एकच आरोपीला ताब्यात घेतले असुन उर्वरित आरोपीला त्वरित अटक करुन कडक शासन करावे.यापुर्वीही सिमेंट कंपनी मध्ये वार्ताकण करण्यास गेलेले पञकार दताञय काळे,महादेव शिंदे व संभाजी मुंडे याच्यावर मारहाण प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नाहीत तेव्हा मा.मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष देऊन या प्राणघातक हल्यातील आरोपींना त्वरित अटक करावे व या प्राणघातक हल्यामुळे मुंडे कुटुंब भयभीत झाले असुन मुंडे कुटुंबाला संरक्षण द्यावे.अशी विनंती परळी पञकारांच्या वतिने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करत आहोत.या निवेदनाच्या प्रति गृह मंञी महाराष्ट्र राज्य, धनंजय मुंडे (पालकमंञी बीड), जिल्हाधिकारी साहेब (बीड), पोलिस अधिक्षक (बीड), पोलिस निरिक्षक (शहर पोलिस स्टेशन), एस.एम.देशमुख (मराठी पञकार परिषद) आदिना पाठवण्यात आले आहे. या निवेदनावर पञकार हल्ला विरोध कृती समितीचे निमंञक मोहन व्हावळे, ज्ञानोबा सुरवसे, आनंद गित्ते, प्रकाश सूर्यकर, धिरज जंगले, दताञय काळे, भगवान साकसमुद्रे, कैलास डुमणे, रानबा गायकवाड, शेख मुकरम, अनंत कुलकर्णी, महादेव गित्ते, माणिक कोकाटे, स्वानंद पाटील, सुकेशनी नाईकवाडे, संजीव राॕय, काशिनाथ घुगे, किरण दौंड, जगदीश शिंदे, आदी पत्रकारांच्या या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.