पिकाला पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू…..केज तालुक्यातील घटना……

केज दि.१०(प्रतिनिधी) – केज (Kaij) तालुक्यातील बनसारोळा येथे मंगळवारी रात्री पिकाला पाणी देण्यासाठी शेतातील मोटार चालू करण्यास गेलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार केज (Kaij) तालुक्यातील बनसारोळा येथील भीमराव दशरथ गोरे हे मंगळवारी रात्री ६/१ सर्वे नंबर मध्ये असलेल्या आपल्या शेतातील विहिरी वरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मात्र मोटार चालू करताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटना बुधवारी सकाळी उघड झाल्यानंतर युसूफ वडगाव चे सहाय्यक पोलिस (Police) निरिक्षक आनंद झोटे, श्री.आटोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करुन बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन प्रेत नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग वाले हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!