Award of Honor धारुरचे प्रसिद्ध उद्योजक माधव निर्मळ यांना मानाचा पुरस्कार ; कौतूकांचा वर्षाव.

किल्लेधारुर दि.27 एप्रिल – धारुरचे प्रसिद्ध उद्योजक माधव निर्मळ यांना उद्योग संचालनालयाच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून देण्यात येणारा मानाचा द्वितीय पुरस्कार ( Award of Honor ) जाहिर झाला आहे. महाराष्ट्र दिनी त्यांना हा पुरस्कार पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतूकाचा वर्षाव होत आहे.
( Award of Honor to Madhav Nirmal, a famous businessman in Dharur; A shower of compliments. )
बीड (Beed) जिल्ह्य़ातील उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना बीड जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने पुरस्कार दिले जातात. सन 2022 विशेष जिल्हा पुरस्कार यंदा मे.नर्मदा देवी काॅटस्पीन एल.एल.पी.चे संचालक तथा नामांकित उद्योजक माधव अंबादासराव निर्मळ यांना जाहीर झाला आहे. माधव अंबादासराव निर्मळ (Madhav Nirmal) यांनी धारुर, माजलगाव व वडवणी तालुक्यात उद्योगाचे जाळे उभे केले आहे. विशेषतः कॉटन उद्योगात त्यांनी अल्पावधीत भरारी घेतली. धारुर (Dharur) तालुक्यात खाद्यतेल निर्मितीत त्यांनी मराठवाड्यात नावलौकिक मिळवला. सध्या धारुर शहरात रिफायनरीचा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. बँकींग क्षेत्रातही निर्मळ यांनी पदार्पण केले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राकडून देण्यात येणारा प्रथम पुरस्कार अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील मे संकेत स्टील इंडस्ट्रीजचे हनुमंत पांडूरंग सोळंके यांना मिळाला. हे पुरस्कार दि.1 मे सोमवार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वितरीत करण्यात येणार आहे. पोलिस परेड ग्राऊंड येथे सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलाकर तांदळे यांनी दिली. माधव निर्मळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.