बँकेचे एटीएम मशीन पळविले…. मशीनमध्ये होते २८ लाख

जालना दि.२८: एसबीआय बँकेचे एटीएम (Bank ATM) मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना जालना (Jalna) शहरातील औद्योगिक वसाहत येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या मशिनमध्ये तब्बल २८ लाखाची रोकड होती. बँकेला सलग सुट्या असल्यामुळे एटीएम (ATM) मशीनमध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आली होती.

अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) नागेवाडी शाखेलगत बँकेचे एटीएम (Bank ATM) मशीन आहे. शनिवारी पहाटे सदरील एटीएम (ATM) मशीन चोरट्यांनी लंपास केली. सीसीटीव्ही कॕमेरात एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत टाकून नेताना चोरटे कैद झाले आहेत. या एटीएममध्ये रोख २८ लाख ६७ हजार ६०० रुपये होते. या रक्कमेसह ४ लाखाचे मशीन असा ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी (SBI) बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!