कापूस लागवड करताना हृदयविकाराच्या धक्क्याने बँक शाखाधिकाऱ्याचे निधन; धारुर तालुक्यातील घटना.

किल्ले धारूर दि.26 जुन – धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथील सुग्रीव मनोहर मंदे (वय ४६) वर्ष हे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा माजलगाव येथे शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते रविवारी दुपारी जहागिरमोहा येथे आपल्या शेतात कापूस लागवड करत होते. यावेळी आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने बँक शाखाधिकाऱ्याचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजलगाव शाखेला शाखाधिकारी (Bank branch officer) म्हणून ते कार्यरत होते. सुग्रीव मनोहर मंदे (वय 46 वर्ष) हे जहागीरमोहा येथे शेतात रविवार असल्याने कापूस लागवड करण्यासाठी आले होते. दुपारी कापूस लागवड चालू असताना अचानक दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
शाखा अधिकारी मंदे यांना तात्काळ उपचारासाठी धारूरकडे (Dharur) हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना जहागीर मोहा धारूर रस्त्यावरील घाटातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जहागीर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
( Bank branch officer dies of heart attack while planting cotton; Incidents in Dharur taluka. )