बापरे…. व्हाट्सअप ग्रुपवरुन काढल्यामुळे एकावर जीवघेणा हल्ला

जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना
नागपूर : दिवसेंदिवस सोशल मेडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून सामान्यात लोकप्रिय ठरत असलेले व्हॉटसअप ॲप WhatsApp आता वादाचे कारणही ठरत आहे. नागपूरमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमधून एका सदस्याला ग्रुप ॲडमिनने काढून टाकल्यानंतर त्यासंदर्भात ग्रुपच्या दुसऱ्या सदस्यानं कमेंट टाकल्याच्या रागातून कमेंट टाकणाऱ्या सदस्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून प्रकरण पोलिसांपर्यंत Police गेले आहे.
एका व्हाट्सअप WhatsApp ग्रुपमधील सुनिल अबिचंदानी असं या हल्ल्यात जखमी झालेल्या ग्रुप सदस्याचं नाव आहे. ग्रुपमधून काढून टाकण्यात आलेल्या चंद्रमणी यादव आणि त्यांचा नातेवाईक छत्रपती यादव यांनी लोखंडी हत्याराने हल्ला करत गंभीर जखमी केले. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सुनिल अबिचंदानी व चंद्रमणी यादव नागपूर Nagpur महापालिकेचे कंत्राटदार आहेत. दोघेही ‘मनपा ठेकेदार संघर्ष’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सदस्य होते. एका ॲडमिननं चंद्रमणी यादवला काही कारणाने ग्रुपमधून काढून टाकल्यावर सुनिल अंबिचंदानी यांनी कमेंट केली होती. या कमेंटवरुन वाद होवून चंद्रमणी आणि छत्रपती यादव यांनी सुनिल यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आपल्याला अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सुनिल यांनी पोलिसात म्हटलं आहे. नागपूर Nagpur पोलीस Police याबाबत अधिक तपास करत आहेत.