उद्योग व व्यापार

बापरे… पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याकडे 26 कोटी रोख व 100 कोटीहून अधिक बेहिशेबी मालमत्ता !

नाशिक दि.24 अॉक्टोंबर – पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील (Market committee) कांदा व्यापाऱ्यांकडे (onion trader) आयकर विभागाला (Income Tax Department) 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

(Bapare … Pimpalgaon onion trader has 26 crore cash and more than 100 crore unaccounted assets!)

केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची (Bank account) तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली.

हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई केली. या कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.

या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात आयकरने कारवाई केली. त्यामुळे कांद्याच्या भावात हजार ते दीड हजाराची घसरण केली. आपण कुठल्याही नियमबाह्य कामाचे समर्थन करणार नाही. मात्र, केवळ दरवाढ झाल्यावरच छापेमारी करणे योग्य नाही. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!