बीड, अंबाजोगाई दोनशे तर केज, परळी मध्ये शतक पार; बीड जिल्ह्याची कोविड संख्या पुन्हा हजारावर.

बीड दि.13 एप्रिल- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 4183 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1018 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3165 जण निगेटिव्ह आली आहेत.
आज सदोतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 216 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज पुन्हा सर्वाधिक अंबाजोगाईत 243 व आष्टी तालुक्यात 98 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 28 केजमध्ये 119 तर परळीमध्ये 140 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
(Beed, Ambajogai two hundred and Kaij, Parli centuries; Covid number of Beed district again in thousands)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-216, अंबाजोगाई-243, आष्टी-98, धारुर-28, गेवराई-50, केज-119, माजलगाव-34, परळी-140, पाटोदा-56, शिरुर-20, वडवणी-14
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.13 मंगळवारी आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात आता कोविड सेंटर फुल होत असुन इतर समस्या पुढे येत आहेत. काल सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढील पंधरा दिवस धोक्याची असल्याचा इशारा दिला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 258 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 हजार 312 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.
भारतात गेल्या 24 तासात 1 लाख 61 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 1 कोटी 36 लाख 89 हजार 453 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.