पंढरपूर-सांगोला रोडवर भीषण अपघात; ५ भाविक ठार ११ जखमी

पंढरपूर: दि.१२- पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांचा पंढरपूर-सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगाव जवळ शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर बोलेरो जीप आदळली. या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर (Kolhapur) मधील चंदगड येथील १६ भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur) येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असताना कासेगाव जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठी मागून बोलेरो गाडीने जोराची धडक दिली. सदरील अपघात (Accident) सकाळी ६ वाजन्याच्या सुमारास झाला. अपघात येवढा भीषण होता की बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात दोन महिला, दोन पुरूष आणि एक अकरा वर्षाची मुलगी अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर (Pandharpur) तालुका पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले. पोलिस (Police) व स्थानिकांनी ११ जखमींना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातातील मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सखाराम धोंडिबा लांबोर (५०), शांताबाई लक्ष्मण लांबोर, पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर, नगुबाई काळू लांबोर (सर्वजण राहणार धनगरवाडी, धामणे, जिल्हा बेळगाव, कर्नाटक ) आणि तुकाराम खंडू कदम ( रा.बादराई कडवळे, ता.चंदगड, जिल्हा. कोल्हापूर ) अशी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!