बीड क्राईम… बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मागितली 3 लाखांची खंडणी; महिलेसह एकास अटक.

बीड दि.25 डिसेंबर – बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका तरुणाकडून 3 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) एका महिलेसह तिच्या मावस भावाला रंगेहाथ पकडले.

(Beed Crime … Threatened to file a rape case and demanded a ransom of Rs 3 lakh; One arrested with woman.)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील एक तरुण नांदेड (Nanded) येथील एका कंपनीत कामाला होता. याठिकाणी काम करत असताना त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पण कालांतराने दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला.

तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर, संबंधित महिला बलात्काराची तक्रार देण्यासाठी नांदेडवरून बीडमध्ये दाखल झाली. यावेळी ती संबंधित तरुणाच्या गावीही गेली. याठिकाणी तरुणाच्या घरच्यांनीही लग्नाला विरोध दर्शवला. लग्नाला विरोध केल्याने संबंधित महिलेनं प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली.

यानंतर तडजोड करून 3 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचं ठरवलं. दरम्यान पीडित तरुणाच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) संतोष वाळके यांच्या कानावर घातला.

त्यानंतर पोलीस अपअधीक्षक वाळके यांच्या आदेशानुसार, शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने बीड शहर बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. याठिकाणी आरोपींनी पीडित तरुणाकडून तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दोघांनीही रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!