मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू…बीडजवळ पुलावरुन कार कोसळली.

बीड : दि.२५- बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चकलांबा जवळ भीषण अपघातात पुण्याकडे मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा कार वरील ताबा सुटून कार पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला. मयत भाजपाचे नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungutivar) यांची चूलत बहीण आणि भाऊजी असल्याची माहिती मिळाली.
(The couple who went to meet the child died in an accident … The car fell off the bridge.)
बीड (Beed) जिल्ह्यातील चकलांबा- तिंतरवनी दरम्यान मातोरी येथे बुधवारी दि.२४ रोजी सायंकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तिंतरवणी येथील एका पुलावर कार वरील ताबा सुटल्याने कार थेट पुलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चारचाकी गाडी भरधाव वेगात असल्याने पुलाखाली जाऊन हा अपघात (Accident) झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. परिसरातील नागरिक व पोलिसांनी (Police) मदतकार्य केले. मयत भाजपाचे नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungutivar) यांची चूलत बहीण आणि भाऊजी असल्याची माहिती मिळाली. सदरील घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.