कोरोना नियंत्रणासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश… जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद

बीड : दि.5 मार्च- गेल्या काही दिवसात बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना (Corona) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज आलेल्या धक्कादायक आकडेवारीनंतर बीडचे (Beed) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी नवीन प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नवीन आदेशान्वये आता ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार, यात्रा, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
(Beed District Collector’s new order for corona control … All week market closed in the district)
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा (corona) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडकपणे राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे.
असे असतील नवीन नियम…
1.आता गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत.
2.सार्वजनिक स्वरूपाचे मेळावे आणि संमेलने बंद करण्यात येत आहेत.
3.खाजगी कोचिंग क्लासेस , यात्रा , आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.
4.शहरी भागात कंटेनमेंट झोनचा निर्णय मुख्याधिकारी तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी घेणार आहेत
5.हातगाड्यावरील विक्रेत्यास कोविड नियमांचे सक्तीने पालन
6.सर्व प्रकारचे राजकीय कार्यक्रम, सभा, आंदोलन, उपोषणास बंदी कलम 144 नुसार कारवाईचे आदेश
7. नागरीकांकडून कोविड नियमांचे सक्तीने पालन करणे नसता दंडात्मक कारवाई
8. कोविड संदर्भात अफवा किंवा अनाधिकृत माहिती सोशल मेडियातून प्रसारीत करणाऱ्यावर फौजदारी कारवाई