बीड जिल्ह्याने अडिचशेची संख्या ओलांडली; अंबाजोगाई, केज, आष्टी, माजलगाव मध्येही वाढ;

बीड दि.14 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2641 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 260 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2381 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाराव्या दिवशी बीड तालुक्यात 123 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 52, माजलगाव 19 तर आष्टी व केज तालुक्यात 15 रुग्ण आढळून आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Beed district exceeds two hundred and fifty; Also increase in Ambajogai, Cage, Ashti, Majalgaon;)

1. बीड- 123             7.माजलगाव-19
2. अंबाजोगाई-52      8.परळी-13
3. आष्टी-15               9.पाटोदा-5
4. धारुर-2              10.शिरुर-5
5. गेवराई- 9           11.वडवणी-2
6. केज-15

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.14 रविवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 260 वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या पाच दिवसांत झपाट्याने वाढली आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाने आज पुन्हा 15 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्याने आदेशानुसार रात्रीची संचारबंदी सुरु झाली आहे. आज आलेल्या अहवालाची संख्या मोठी असून प्रशासनाने व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!