बीड जिल्ह्यात आजवरची सर्वाधिक संख्या; केजची शतकपुर्ती; अंबाजोगाई व बीड द्विशतक, आष्टी द्विशतकाकडे, धारुर 30.

बीड दि.11 एप्रिल- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. काल बीड (Beed) जिल्ह्यातील 5681 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1062 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4619 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Beed district has the highest number to date; Kaij’s centenary; Ambajogai and Beed double centuries, Ashti double centuries, Dharur 30.)
आज पस्तीसाव्या दिवशी बीड तालुक्यात 220 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर अंबाजोगाईत 223 व आष्टी तालुक्यात 193 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 30 केजमध्ये 106 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-220, अंबाजोगाई-223, आष्टी-193, धारुर-30, गेवराई-64, केज-106, माजलगाव-34, परळी-75, पाटोदा-53, शिरुर-45, वडवणी-19
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) चा राज्यासह बीड जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.11 रविवारी दुपारी आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. मंगळवारी 716, बुधवारी 580 गुरुवारी 711, शुक्रवारी 732, शनिवारी 764 तर आज रविवारी 1062 कोरोना बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्यात वाढती बाधितांची संख्या प्रशासनासमोर आवाहन उभे करत आहे. जिल्हाभरात अनेक कोविड सेंटर क्षमतेप्रमाणे भरलेली असून वाढीव खाटांचे नियोजन सुरु आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात शनिवारीही रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला आहे. दिवसभरात 55 हजारावर नवीन करोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे शनिवारीही दिवसभरात 309 रूग्णांचा मृत्यू झाला. तर 53 हजारावर रुग्णांची सुट्टी झाली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून याची घोषणा कोणत्याही क्षणी होवू शकते.