कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याची संख्या 732; जिल्ह्यात कोविड तपासणीला वेग.

बीड दि.8 एप्रिल- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांत तपासणीचा वेग वाढला असून तपासणीच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी दिसत आहे. काल बीड (Beed) जिल्ह्यातील 5899 प्राप्त अहवाल होते तर आज तब्बल 6496 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 732 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5764 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तेहतिसाव्या दिवशी बीड तालुक्यात तब्बल 219 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीडनंतर अंबाजोगाई व आष्टी तालुक्यात प्रत्येकी 127 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 17 केजमध्ये 67 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

(Beed District No. 732; The faster the detection, the lower the number of positives.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-216, अंबाजोगाई-127, आष्टी-127, धारुर-17, गेवराई-55, केज-67, माजलगाव-35, परळी-48, पाटोदा-26, शिरुर-6, वडवणी-8
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा राज्यासह बीड जिल्ह्यात उद्रेक वाढला आहे. बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.9 शुक्रवारी दुपारी आजची आकडेवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे. मंगळवारी 716, बुधवारी 580 गुरुवारी 711, तर आज 732 कोरोना बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दरातही वाढ होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात दिवसभरात तब्बल 56 हजार पार कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, काल 322 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!