बीड जिल्ह्याची संख्या पाचशेकडे; केज 34 तर धारुर 8

बीड दि.4 एप्रिल- बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस उग्र होत आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2959 प्राप्त अहवाला पैकी 486 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2473 जण निगेटिव्ह आली आहेत. आज अठ्ठाविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज तब्बल 120 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. आज अंबाजोगाई तालुक्यात 107 बाधित आढळली. धारुर 8 तर केजमध्ये 34 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.
(Beed district number five hundred; Kaij 34 and Dharur 8)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-120, अंबाजोगाई-107, आष्टी-57, धारुर-8, गेवराई-30, केज-22, माजलगाव-37, परळी-43, पाटोदा-26, शिरुर-15, वडवणी-9
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.4 रविवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 434 वरुन वाढत 486 झाली आहे. बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. 50 हजार पेक्षा जास्त नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण राज्यात आढळून आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यावर लॉकडाऊनचे सावट आहे. काल मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेवून पुन्हा कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे.