बीड जिल्हा सलग दुसऱ्या दिवशीही हजाराच्या आत; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.20 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 3877 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 992 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2885 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी होत आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या आत आकडा आला आहे.
(Beed district within a thousand for the second day in a row; See Taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 129 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 70 व आष्टी तालुक्यात 114 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 53 तर केजमध्ये 108 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आष्टी नंतर केज व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-129, अंबाजोगाई-70, आष्टी-114, धारुर-53, गेवराई-94, केज-103, माजलगाव-54, परळी-55, पाटोदा-167, शिरुर-128, वडवणी-25 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काल नवीन आदेश काढत आता ग्रामीण भागातील सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना गावातच संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची (Corona Cases in India) भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.