बीडच्या डॉक्टर तरुणीवर जळगावात हातपाय बांधून अत्याचार; एकावर गुन्हा नोंद… आरोपी फरार.

बीड दि.28 सप्टेंबर – बीड जिल्ह्यात राहणाऱ्या व सध्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीवर लग्नाचे आमीष देऊन पाच वर्षे अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील प्रकरणातील आरोपी हा परिचारक म्हणून कार्यरत असून विवाहित आहे. तरुणीने विरोध करुन देखील तिला जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(Beed doctor tortures young woman in Jalgaon; Crime registered against one … accused absconding.)

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाच्या विरोधात अखेर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनतंर जळगाव एमआयडीसी (MIDC) पोलिसात आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संपत लक्ष्मण मल्हाड (मुळ रा.दरिबडची, ता. जत, जि. सांगली) असे परिचारकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानतंर परिचारक बेपत्ता झाला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी उस्मानाबाद येथे नर्सिंग कॉलेजला नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली येथे गेली होती. या दरम्यान तीची संपतशी ओळख झाली. त्यावेळी संपतने तीला लग्नाचे आमीष दाखवून तीच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानतंर संपतने अनेकवेळा तीच्याकडून पैसे देखील घेतले. दरम्यान, अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तीला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात करवून घेतला. यानंतर मागील वर्षी मार्च मध्ये संपतने लग्न केल्यानतंर या पिडीतेने संबंध तोडले.

लग्न झाल्यानतंर देखील संपतने तीच्या गावी जाऊन प्रेमसंबधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली. सप्टेबर 2020 मध्ये औरंगाबाद येथे बोलावून घेत पुन्हा अत्याचार केले. यानंतर 6 सप्टेबर 2021 रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावून घेतले. पांडे डेअरी चौकातील मैत्रीणीच्या रुमवर घेऊन गेला. तेथे
त्याने थेट हात-पाय बांधून तीच्यावर अत्याचार केले. तीला जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटने नंतर एका खासगी वाहनातून तरुणीस बीड (Beed) येथे मुळगावी सोडून आला. अखेर संपतने केलेल्या अत्याचारास वैतागलेल्या तरुणीने जळगावात एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Police Station) जाऊन फिर्याद (complaint) दिली. त्यानुसार संपतच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!