राजकीय

Beed Election शरद पवार गटाकडून बजरंग सोणवने बीड लोकसभेचे उमेदवार.

66 / 100

बीड दि.4 एप्रिल – Beed Election गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्चितीवर शेवटी आज पडदा पडला. शरद पवार गटाकडून बीड लोकसभेसाठी आज बजरंग सोणवने यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटिल यांनी केली.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी हळूहळू रंगात येत आहे. महायुतीकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर महाआघाडीचा उमेदवार कोण ? असा प्रश्न पडला होता. ज्योती मेटे व बजरंग सोणवने यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते. शेवटी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून बीडसाठी बजरंग सोणवने यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बजरंग सोणवने गतपंचवार्षिकला लोकसभेचे उमेदवार होते. त्यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्क असून पुर्वानुभवामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!