बीड पोलिसांकडून करुणा शर्माच्या मुंबईतील घरी सर्च अॉपरेशन; शर्मा यांचा कोठडीचा मुक्काम वाढला.

बीड/मुंबई दि.8 सप्टेंबर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल (Pistol) आढळल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Magistrate Custody) सुनावण्यात आली होती. मात्र आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीत सहा दिवसांची वाढ झाली असून 14 सप्टेंबर रोजी सुणावनी होणार आहे. दरम्यान बीड पोलिसांचे (Beed Police) पथक करुणा शर्मा यांच्या मुंबई येथील निवासस्थानी तपास कामी दाखल झालं आहे.

(Beed police search operation at Karuna Sharma’s Mumbai home; Sharma’s cell stay increased.)

करुणा मुंडे-शर्मा (Karuna Munde) यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून त्यांनी बीड न्यायालयात (Beed Court) जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यावर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
त्यामुळे आणखी सहा दिवस त्यांना तुरुंगात राहावे लागणार आहे. परळीत येणे त्यांना चांगलेच भोवले असून पाच सप्टेंबर पासून त्या पोलिस कोठडी किंवा तुरुंगात आहेत.

त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी बीड तुरुंगात हलविण्यात आले. त्यांना वकिलही मिळू शकला नाही. त्यांनी स्वतःच न्यायालयात आपली बाजू मांडली. न्यायालयात जामीन अर्ज करण्यासाठी काल त्यांना वकिल मिळाला. त्यानुसार आज अर्ज दाखल झाला. त्यावर आता 14 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

या प्रकरणात बीड पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं असून करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. करुणा शर्मा प्रकरणात तपासासाठी बीड पोलिसांचं पथक मुंबई दाखल झालं होतं. हे पथक सकाळी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मदतीने पुढील तपास करत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन (search operation) सुरु आहे.

करुणा शर्मा सध्या बीड (Beed) पोलिसांच्या अटकेत आहेत. करुणा शर्मा परळीत गेल्या असताना त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडले होते. याप्रकरणी शर्मा यांच्यावर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल आहे. तर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी गाडी चालकावर गुन्हा दाखल आहे. सध्या करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. अंबेजोगाई न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!