बीड तालुका कोरोनाच्या रडारवर…जिल्ह्याची आजची तालुका निहाय आकडेवारी…

बीडः-3 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 947 प्राप्त अहवाला पैकी 57 जनांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 890 जन निगेटिव्ह आली आहेत आज सर्वाधिक 22 कोरोना रुग्ण बीड तालुक्यात आढळले. काल ही संख्या 37 होती. काल 1045 अहवालापैकी 80 रुग्ण आढळले होते. सतत दोन दिवस सतत सर्वाधिक संख्या बीड तालुक्याची आहे. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Beed taluka on the radar of Corona … Today’s taluka wise statistics of the district …)
1. बीड- 22 7.माजलगाव-3
2. अंबाजोगाई-11 8.परळी-3
3. आष्टी-9 9.पाटोदा-1
4. धारुर-0 10.शिरुर-3
5. गेवराई-3 11.वडवणी-0
6. केज-2
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.4 गुरुवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, काल बीड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. ती आजही कायम असून आजही 22 पॉझिटीव्ह रुग्ण एकट्या बीड तालुक्यात आढळली आहेत. जिल्ह्यात आज प्राप्त अहवाल व पॉझिटीव्ह रुग्ण संख्या कालपेक्षा कमी आहे.