बीडच्या तरुणींने प्रियकराचा गळा आवळून केली हत्या; पोलिस तपासात खूनाचा झाला उलगडा.

बीड दि.11 सप्टेंबर – प्रेम प्रकरणातून एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील घोटा गावचा रहिवासी असून ही घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Police) प्रेयसीला अटक केली आहे.

(Beed’s young woman strangled her boyfriend to death; Police investigation reveals murder)

सोनल पुरुषोत्त दवाळे (वय 34), असे हत्या (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून फुरसुंगी येथे एका फ्लॅटवर राहत होता. याचवेळी त्याची बीडच्या (Beed) एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होते.

त्यांच्यामध्ये संशयावरून भांडण झाले. याच भांडणाचे रुपांतर सोनलच्या जीवावर उठले. प्रेयसीने सोनलचा गळा दाबून त्याला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो घटनास्थळावर तसाच पडून होता, तरीही प्रेयसीने दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनलच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोनलकडे दुर्लक्ष केल्याने आणि त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

सर्व प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता शवविच्छेदन अहवालात (Autopsy report) या प्रकरणाचे सत्य समोर आले. तिने गळा दाबल्याने व डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट अहवाल डॉक्टरांनी दिल्यावर हडपसर पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक करून गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात आरोपी मुलीने गळा दाबून डोक्याला मारल्याने सोनलचा मृत्यू झाला हे तपासात निष्पन्न झाले आहे.

मृत सोनलच्या गळ्यावर नखाचे निशाण दिसून आले. दोघांमध्ये झालेल्या भांडणात चांगलीच झटापट झाली. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला, असे तपासात दिसून आले आहे. यामध्ये सोनलचा खूनच झाला हे सिद्ध झाले असता तक्रारदार निवास दवाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुलीला अटक केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!