क्राईम

Bengali craftsman absconde तब्बल अर्धा किलो सोने घेवून बंगाली कारागीर फरार.

51 / 100 SEO Score

माजलगाव दि.15 मे –  Bengali craftsman absconde तब्बल अर्धा किलो सोने Gold घेवून बंगाली कारागीर फरार झाल्याची घटना माजलगाव शहरात घडली. शहरातील पाच सराफा व्यापाऱ्यांचे जवळपास 30 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने Gold घडई (डीझाईन) करण्यासाठी दिलेले सोने घेवून बंगाली कारागीरांनी धूम ठोकली. याबाबत सराफ व्यापाऱ्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मात्र अद्याप पोलिसात City Police तक्रार देण्यात आलेली नाही.  Bengali craftsman absconded with nearly half a kilo of gold

माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील बहुतांश व्यापारी हे ग्राहकांनी दिलेली घडई (डिझाईन) बनवण्यासाठी या ठिकाणी डिझाईन बनवण्याचे दुकान टाकून काम करणाऱ्या बंगाली कारागीरांकडे देतात. सर्व व्यापाऱ्यांकडून सोने Gold देऊन त्यांच्याकडूनच विविध डिझाईन मध्ये दागिने तयार केले जातात. अशाच प्रकारे शहरातील पाच व्यापाऱ्यांनी डिझाईन बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन बंगाली कारागीर शनिवारी रात्री शहरातून फरार Bengali craftsman absconde झाले असल्याचे सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या बंगाली कारागीराने पाच व्यापाऱ्यांचे जवळपास अर्धा किलो सोने Gold घेऊन धूम ठोकली असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर एक मोटार सायकल ( एम.एच.20 इ एक्स 3134) नेली आहे. या सोन्याची किंमत जवळपास 30 लाख रुपये व मोटरसायकलची किंमत 90 हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत हे व्यापारी रविवारी शहर पोलीस City Police ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी या सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत पोलीस ठाण्याकडे फिरकले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!