माझं गाव

माजलगावात रत्नसुंदर स्मृती रुग्णालयाचे आज भुमी पुजन; तर धारुर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांचा आ.सोळंके यांच्या हस्ते शुभारंभ.

माजलगाव/किल्लेधारूर दि.18 अॉगस्ट – आज दि.18 बुधवारी सकाळी 11 वाजता माजलगाव येथे रत्नसुंदर स्मृती रुग्णालयाचे (Ratnasunder Memorial Hospital) भुमी पुजन होत असून धारुर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून (Mukhyamantri Gramsadak Yojana) होणाऱ्या विविध रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दुपारी 3 वाजता माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

(Bhumi Pujan of Ratnasunder Memorial Hospital in Majalgaon today; In Dharur taluka, the work of Mukhyamantri Gramsadak Yojana was inaugurated by MLA Solanke.)

धारुर तालुक्यातील जैतापूर, गोपाळपूर, आरणवाडी व वाघोली येथे होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दिनांक 18 ऑगस्ट रोजी माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश दादा सोळंके (Prakash Solanke) यांच्‍या हस्‍ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास बीड जि. प. चे बांधकाम व अर्थ समितीचे सभापती जयसिंग भैय्या सोळंके, धारूर (Dharur) पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कामामुळे तालुक्यात विकासाला मोठी चालना मिळणार असून येथील ग्रामस्थांची सोय होणार आहे. या कार्यक्रमास संबंधित गावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नसुंदर मेमोरीयल हॉस्पिटलचे भुमी पुजन
माजलगाव मतदार संघातील जनतेला सर्वसोयीयुक्त आरोग्य सेवा देण्यासाठी आ. प्रकाशदादा सोळंके, चेअरमन धैर्यशिल काका सोळंके व जि.प. सभापती जयसिंगभैय्या सोळंके यांच्या दुरदृष्टीतून रत्नसुंदर रुग्णालयाचा पाया रोवण्यात येत आहे.

माजलगाव (Majalgoan) शहरातील बायपास रोडवर आज दि.18 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता रत्नसुंदर मेमोरीयल हॉस्पिटलचे भुमी पुजन ह.भ.प. एकनाथ महाराज माने यांच्या हस्ते होत आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आ. डी.के. देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, बाजीराव जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजलगाव विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मंगला प्रकाशराव सोळंके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!