BEED24

अंबाजोगाईत मोठी कारवाई… साडे अठरा लाखांचा मुद्देमालासह २७ जण ताब्यात

अंबाजोगाई: दि.२१(प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.२०) अंबाजोगाई (Ambajogai) येथे कारखाना रोडवरील एका पत्त्याच्या क्लबवर (playing card club) छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी झन्ना-मन्ना जुगार खेळणाऱ्या २७ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी पोलीस (Police) अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत (Ambajogai) दाखल झाले. यावेळी अंबाजोगाई – साखर कारखाना रोडवर मोरेवाडी शिवारात काही व्यक्ती झन्ना-मन्ना (फेक पत्ता) नावाचा जुगार (Gambling) खेळत असल्याची गुप्त माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक विलास हजारे यांना मिळाली. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी रात्री ९.३० वाजता पथकातील कर्मचाऱ्यांसह सदर पत्त्याच्या क्लब (playing card club) ठिकाणी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी तीन गटात २७ व्यक्ती जुगार (Gambling) खेळत आणि खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ५७ हजार दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह ११ दुचाकी, १ चारचाकी, मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एपीआय विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून २७ जुगाऱ्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस (Police) अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. विलास हजारे, पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलमवाड, तौर यांनी पार पाडली. एवढ्या मोठ्या संख्येने जुगारी पकडले गेल्याने शहरात खळबळ उडाली असून कारवाईबद्दल पोलिसांचे (Police) कौतुक होत आहे.

Exit mobile version