धक्कादायक ! स्वॅब घेतलेल्या इसमाचा बीड आयसोलेशन वॉर्ड मध्ये मृत्यू
आज येणार होता अहवाल

बीड दि.८(प्रतिनिधी); बीड येथील आयसोलेशन वार्डात उपचार घेत असलेल्या दोन वेळेस तपासणीला पाठवलेले थ्रोट स्वॕब अहवाल अनिर्णयीत आलेल्या एका तरुणाचा पहाटे मृत्यू झाला. सदरील तरुणाचा स्वॕब आज सकाळीच तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचा रिपोर्ट आज सायंकाळी प्राप्त होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अशोक थोरात यांनी सांगीतले .
मृत्यू झालेला ३२ वर्षीय तरुण व त्याचे कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून मातकुळी ( ता.आष्टी ) येथे परतले होते. एका बाधित रुग्णासोबत या कुटूंबाचा संपर्क आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दाम्पत्यांसह त्यांच्या दोन मुलांचे जिल्हा रुग्णालयात स्वॕब तपासणीसाठी घेतले होते. यात तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर या तरुणाचा रिपोर्ट अनिर्णयीत राहिला होता. पुन्हा ४८ तासांनी त्या व्यक्तीचा स्वॕब घेतला परंतू तो रिपोर्टही अनिर्णीत आला होता. रविवारी रात्री त्या तरुणाचा स्वॕब घेवून पाठवण्यात आला. परंतू आज सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.