पॉझिटीव्ह न्यूज …. धारूर येथील 70 वर्षाच्या आज्जीसह तीन बालकांची कोरोनावर मात.

किल्लेधारूर दि.14 मे – धारूर (Dharur) येथील पुजदेकर कुंटूंबातील आज्जी बरोबर तीन बालकं कोरोना बाधित (Corona Positive) झाली होती. या सर्वांनी यशस्वी पणे कोरोना वर मात करून कोरानामूक्त होऊन घरी परतले. यावेळी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या बालकाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
(Positive News …. Three children, including a 70-year-old grandmother from Dharur, beat Corona.)
शहरातील कसबा विभागातील शाम पुजदेकर यांचे आई थोड्या आजारी असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) निघाल्याने घरातील सर्वांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. शाम पुजदेकर व त्यांचे पत्नीची कोव्हिड टेस्ट निगेटीव्ह आली.
मात्र घरातील दोन लहान मुली व एक मुलगा यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आली. या मधील सुमित शाम पुजदेकर वय 5 वर्ष, अदिती पुजदेकर वय 7 वर्ष सोनू पुजदेकर 9 वर्ष ऐवढ्या लहान वयाचे होते. लहान बालकं पॉझिटीव्ह आल्याने या कुंटूंबात थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
धारूर (Dharur) येथील कोव्हिड केअर सेंटरला (Covid care center) आठ दिवसांपुर्वी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तिन्ही बालकांनी कोव्हिड सेंटर मधील डॉक्टर्स व कर्मचारी यांना चांगला प्रतिसाद देत उपचार घेतले. या ठिकाणी व्यवस्थित राहून या तिन हि बालकांनी कोरोना वर मात केली. जिद्दीने या सर्व बालकांनी आजी सह येथे राहून कोरोना वर यशस्वी पणे मात केली.
या बालकाचे वडील शाम पुजदेकर यांना या बाबत विचारले असता हे तिघे हि जन कोव्हिड सेंटरला थांबले उपचार घेतले. आठ दिवसात कधी हि घरी येण्यासाठी मागे लागले नाहीत. गुरूवारी सर्वांनी कोरोनावर यशस्वी पणे मात करून कोव्हिड केअर सेंटर (Covid care center) वरून सुट्टी देण्यात आली.
येथील कर्मचारी वर्गाने आनंदाने या बालकांना आनंदाश्रू डोळ्यात आणत निरोप दिला. कोरोनावर यशस्वी मात करून आज्जीसह हि तिन बालके सात दिवसा नंतर घरी आल्यास पुष्पवृष्टी करून औक्षंण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या तिन हि बालकाचे सर्वत्र कौतूक होत आहे.