भोंग्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत मोठा निर्णय; भाजपाने घेतली ही भुमिका.

मुंबई दि.25 एप्रिल – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी आज भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कुठल्याही भोंग्यावर बंदी घालता येणार नाही असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या सर्वपक्षीय बैठकीवर (All party meeting) भाजपाने (BJP) बहिष्कार घातला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याऐवजी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी बैठकीत हजेरी लावली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) बिघडवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे सांगत या बैठकीला हजर राहिले नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत या सर्वपक्षीय बैठकीची माहिती दिली. वळसे पाटील यांनी सांगितले की, या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये याबाबत निर्णय दिला होता. महाराष्ट्र सरकारने 2015 ते 2017 या कालावधीत काही शासन निर्णय काढले आहेत. त्यांच्या आधारे लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावण्याच्या संदर्भात सर्व स्पष्टता आहे. या निर्णयाच्या आधारे लाऊडस्पीकरचा वापर केला जातो. मात्र काही जण भोंगे उतरवण्याच्या संदर्भात बोलत आहेत. भोंगे उतरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारला कारवाई करता येत नसल्याचे गृहमंत्री वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी जत्रा, भजने आणि काकड आरत्या सुरु असतात. त्यामुळे सरसकट लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई करण्यास अवघड होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस (Police) आपले काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय असल्याने संपुर्ण देशाला हा निर्णय लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसे 3 मेच्या अल्टिमेटमवर ठाम तर भाजप व रिपाईचा बहिष्कार …
मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून 3 मेचा अल्टिमेटम कायम असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. आज झालेल्या सर्वपक्षीय बेठकीवर भाजपसह रिपाइंचाही (RPI) बहिष्कार होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हे सरकारच करीत असल्याचा आरोप भाजप व आरपीआयकडून करण्यात आला आहे.
( Big decision on loudspeakers in all-party meeting; This role was taken by BJP. )