इतिहासप्रेमींचे असेही साहस….

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) येथील इतिहास (history) प्रेमी तरुणांनी बुरुजावर आलेल्या वटवृक्ष निर्मुलनासाठी मोठे साहस केले असून झुलत्या झोक्याच्या सहाय्याने साहसवीर कायाकल्पचे (Kayakalp) दिनेश कापसे यांनी काम झुडूप निर्मुलनाचे काम फत्ते केले.
येथील ऐतिहासिक (History) किल्ल्यात (fort) नेहमीच कार्यतत्पर राहणाऱ्या इतिहास प्रेमी तरुणांनी आज रविवार दि.२० रोजी धाडसी काम केले. किल्ल्यातील (fort) विविध बुरुजांवर वटवृक्ष आल्याने भिंतीना धोका निर्माण झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले. किल्ल्यातील खारी दिंडी परिसरात चादरीवर दर रविवारी कायाकल्प सामाजिक संस्थेकडून काम केले जाते. कायाकल्प (Kayakalp) चे अध्यक्ष दिनेश कापसे यांनी सदरील बुरुजावरील झुडूप काढण्याचा निर्णय घेवून कामगिरी फत्ते केली. अत्यंत अवघड टेहळणी बुरुजावरील वटवृक्षाची सर्व झुडूप झुलत्या झोक्याच्या सहाय्याने काढत साहसी काम केले. यावेळी किल्ल्यातील कामावर असलेले पुरातत्व विभागाचे अभियंता नितिन चारुडे, जलदूत विजय शिनगारे, शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद, पत्रकार सय्यद शाकेर, अतुल शिनगारे, युथ क्लबचे अध्यक्ष सुरेश शिनगारे उपस्थित होते.