महिला कामगार व कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी… शासनाने केले हे बदल

दिल्लीः दि.२- कामगार मंत्रालयाने संसदेत नवीन कामगार संहिता (Labour code) प्रस्तावित केली असून संहिता पास झाल्यानंतर नवीन कामगार संहितेचा सर्वाधिक फायदा महिला कामगारांना होणार आहे. कामगार मंत्रालयाने स्री-पुरुष समानता दाखविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
कामगार मंत्रालयाने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पगारापासून कामावर बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे. आधार लिंक असलेल्या खात्यांमधील डिजिटल पेमेंटमुळे महिलांसाठी समान वेतन आणि किमान वेतन निश्चित झाले आहे. याचा फायदा कामगार महिलांना मोठ्या प्रमाणात होईल. नवीन कामगार संहितेत (Labour code) असलेल्या माहितीनुसार, त्यांना खाणकामसह इतर अनेक क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. एवढेच नव्हे तर पगाराच्या बाबतीतही त्यांना पुरुषांइतकाच दर्जा देण्यात यावा. सर्वांना समान वेतनाची तरतूदीसह डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून महिला कमी पगार मिळण्याच्या चिंतेतून मुक्तता होईल. याशिवाय आतापर्यंत देशातील असंघटित क्षेत्रातील पुरुषांपेक्षा महिला कामगारांना कमी पगार दिला जात होता, आता पगारातील भेदभावही नव्या कामगार संहितामुळे संपविले जाईल. महिला कामगारांना (Woman worker) बांधकाम, खाणकाम (Mining and construction) इत्यादी सर्व क्षेत्रात काम करण्याची मुभा मिळणार आहे. महिला कामगारांना (Woman worker) खाणकाम आणि बांधकाम (Mining and construction) यासारख्या क्षेत्रात पुरुष कामगारा प्रमाणे किमान वेतन या संहितेमुळे मिळणार आहे. विविध क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिला कामगारांची संख्या अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन देण्याची प्रथा रुढ झाली आहे. यावर आता अंकुश बसणार असून महिलांना समान वेतनाला लाभ होणार आहे.