मोठी बातमी … आयपीएल रद्द; बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा.

नवी दिल्ली 04 मे – क्रिकेट विश्वातील अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच आयपीएलच्या (Indian premium league) यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी यंदाचा आयपीएलचा (IPL) हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहिर केले आहे.
(Big news … IPL canceled; Announcement by BCCI Vice President Rajiv Shukla.)
यापुर्वी सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला (IPL) सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला होता. आजच्या सामन्यावर सुद्धा कोरोनाचे संकट ओढावले होते. पण योग्य ती खबरदारी घेत, सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.