मोठी बातमी… ईडीच्या रडारवर खा.संजय राऊत; राऊतांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई.

मुंबई दि.5 एप्रिल – शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ईडीकडून (ED) संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील दादर येथील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याबाबत खा.राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत ईडींन माझं राहतं घर जप्त केल्याची माहिती दिली.
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाया सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर आज ईडी कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. राऊत यांची अलिबाग येथील मालमत्ता आणि दादर येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीनं टाच आणली आहे. ही आतापर्यंतची ईडीची सर्वात मोठी कारवाई आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना खा. राऊत यांनी सदर संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली आहे. एक एकरही जमीन नसताना सुडबुध्दीतून कारवाई केली आहे. यात आमचं दादर येथील राहतं घर देखील जप्त केल्याची माहिती दिली. एका मराठी माणसांवर झालेल्या कारवाईमुळे भाजपाकडून फटाके फोडले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. एक रुपयाही मनि लॉन्ड्रींग तर सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करु असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत शिवसेनेच्या तीन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीधर पाटणकर यांच्यानंतर आज खा. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली. ‘असत्यमेव जयते’ असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
( Big news … MP Sanjay Raut on ED’s radar; Confiscation of Raut’s property. )